बीड (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील जातेगाव व जायकवाडी सिंचन वसाहतीत अतिक्रमण करण्यात आले असून अतिक्रमण करणार्यांना अनेक वेळा नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मात्र ते आपले अतिक्रमण हटवत नसल्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगाव व परिसरात जायकवाडी सिंचन शाखा क्र. 5 जातेगाव अंतर्गत असलेल्या वसाहतीतील निवासस्थानामध्ये अनाधिकृतपणे राहत असलेल्या अतिक्रमणधारकांविरुद्ध जायकवाडी पाटबंधारे विभागामार्फत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. संबंधितांना प्रथम तीन दिवसांची नंतर सात दिवसांची नोटीस देण्यात आली. तरीही अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. सदरील अतिक्रमण हे बेकायदेशीर असून शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न काही जणांचा असून शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जायकवाडी विभाग ठोस पावले उचलणार असल्याचे विभागाचे नागेश गट्टेवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.











