बीड (रिपोर्टर) बीड शहरात आज दुपारी थरारक घटना घडली. फुटलेली पाईप लाईन दुरूस्त करणार्या एका तरूणावर अज्ञात तरूणाने गोळीबार करत दोन गोळ्या घातल्या. त्यात तो जखमी तरूण जागेवर मेला नसल्याचे पाहून त्याचा पाठलाग करत मारेकर्याने त्याला चाकूने भोसकून जागीच ठार केल्याची घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अंकुशनगर, साई पंढरी लॉन्सच्या समोर घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हर्षद शिंदे नावाचा नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेला कर्मचारी अंकुशनगर भागात साई पंढरी लॉन्ससमोरील पाईप लाईन फुटली म्हणून त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम करत होता. त्यावेळी अज्ञात मारेकरी त्या ठिकाणी आला. त्याने हर्षद शिंदेच्या दिशेने बंदूक काढत थेट गोळीबार केला. या गोळीबारात हर्षद शिंदे हा जखमी झाला. आणि घटनास्थळापासून काही अंतरावर जखमी अवस्थेत स्वत:चा जीव वाचवत गेला. मात्र मारेकर्याने त्याचा पाठलाग करत चाकूने त्याला भोसकले. ही खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे सांगण्यात येते.
लवकरच या घटनेचे सविस्तर वृत्तांत देवू.












