• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष/लिहिलेलं पुसलं जातं, लोकांच्या मनात कोररलेलं कसं पुसाल ?

by गणेश सावंत
January 6, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कटाक्ष/गणेश सावंत
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी काल लातूरमध्ये जे वक्तव्य केलं ते वक्तव्य पाहता रविंद्र चव्हाणांवर झालेल्या संस्काराची आणि भाजपाच्या संस्कारी दाव्याची एकप्रकारे हत्या म्हणावी लागेल. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विलासरावांचे नाव लवकरच पुसले जाईल. असे रविंद्र चव्हाणांनी केलेले ते वक्तव्य चव्हाणांची नितीमत्ता आणि भाजपाची निती दाखवून देते. खरंतर आपल्याकडे असे संस्कार आहेत, मृत्यूनंतर त्या व्यक्तीबाबत चांगले बोलायचे नसेल तर वाईट तरी बोलू नये. परंतु रविंद्र चव्हाणांनी ज्या विलासरावांबाबत वक्तव्य केले त्या विलासरावांच्या कर्तृत्वकर्माच्या आलेखाची जी रेख आहे त्या रेखीची उंचीची सावली रविंद्र चव्हाणांना झेपणारीनाही. आम्हा मराठवाडाकरांकडे स्वातंत्र्यानंतर क्षुद्रतेनेच पाहिले गेले. जसे व्यवस्थेचे दुर्लक्ष तसे

साक्षात यमाचे लक्ष
आमच्याकडे दुर्दैवाने जास्त प्रमाणात राहिल्याचे या दोन दशकांच्या कालखंडात प्रामुख्याने पहायला मिळाले. दिल्ली तक्तावर लक्ष केंद्रित करणो प्रमोद महाजन असोत अथवा या मराठमुलुखाची आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ गोपीनाथराव असोत किंवा विलासरावांसारखे शांत-संयमी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे मराठवाड्याचे भूषण असोत हे तिघेही अकाली आमच्यातून निघून गेले. नव्हे नव्हे तर साक्षात यमाने आमच्याकडून ते हिसकावून नेले. या तिन्ही नेत्यांच्या कर्तृत्व कर्माच्या उंचीबाबत आम्ही बोलणेही म्हणजे शिखराला गवसनी घालणे. तरीही आमदारकीच्या व्यासात आणि मतदारसंघाच्या डबक्यात राहिलेले रविंद्र चव्हाण जेव्हा असे वक्तव्य करतात तेव्हा
भाजपाचा हाच का हिंदू धर्म ?

स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेले वक्तव्य केवळ बेजबाबदार नाही, तर ते त्यांच्या संस्कारशून्य राजकारणाचं विदारक दर्शन घडवणारे आहे. या वक्तव्यातून रवींद्र चव्हाण यांची वैचारिक दिवाळखोरी तर उघडी पडलीच, पण भाजप ज्या तथाकथित हिंदुत्वाचा गळा फाडून करते, त्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटाही अक्षरशः गळून पडला आहे. हिंदू संस्कृतीत दिवंगत व्यक्तीला पूजनीय मानले जाते. मृत्यू झाल्यानंतरही त्या व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात, श्रद्ध, तर्पण, स्मरणदिन यांसारखे विधी दरवर्षी श्रद्धेने केले जातात. हीच तर आपली संस्कृती, हेच तर आपले हिंदुत्व! पण याच हिंदुत्वाची शाल पांघरून राजकीय दुकानदारी करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष लातूरमध्ये उभे राहून स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कायमची पुसून टाकण्याची भाषा करतात ही मानसिकता नेमकी कुणाची ?हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही, तर संस्कारांचा आहे. संध्याकाळची वेळ होती, रवींद्र चव्हाण शुद्धीत होते की नव्हते, हा प्रश्न वेगळा. पण जर शुद्धीत असतील, तर त्यांनी एकदा ९८२११२५००० हा स्व. विलासराव देशमुखांचा मोबाईल नंबर डायल करून पाहावा. हो, तो नंबर आजही सुरू आहे. आजही असंख्य कार्यकर्ते, नागरिक त्या नंबरवर फोन करून साहेबांचे शब्द ऐकतात, त्यांची आठवण जपतात. देशमुख परिवाराने तो नंबर सुरू ठेवला, कारण दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जतन करणे हाच आमचा संस्कार आहे तो भाजपला कधीच कळणार नाही. काँग्रेसने कधीही मृतांच्या स्मृती पुसण्याचं राजकारण केलं नाही आणि आम्ही जेव्हा केव्हा संस्कार, संस्कृती भरकटणारे नेते अभिनेते आणि सर्वसामान्य भेटतात तेव्हा त्यांच्यावर

कटाक्ष टाकतो
वाचकांना आठवत असेल, एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टमधून बाल बाल बचावले तेव्हा महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणणारे आणि भाजपा विरोधातल्या ट्रोलधाडींनी फडणविसांच्या मरणाबाबत खिल्ली उडवत सोशल मिडियावर आपली संस्कृती दाखवली होती. तेव्हाही आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची आठवण करून दिली होती. महाराष्ट्र हा कर्तव्य कर्माला महत्व देतो आणि तो आठवणीतही ठेवतो विलासाख देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख सक्दाचा एक व्हिडिओ केला त्यामध्ये ते म्हणतात,लिहिलेलं नाव पुसलं जातं, परंतु लोकांच्या मनात कोरलेलं नाव कधीच पुसलं जात नाही आणि ते खरंय. हे रविंद्र चव्हाणांनी ओळखावं.

Previous Post

खळबळजनक…बीडमध्ये तरूणावर गोळीबार,दोन गोळ्या झाडल्या नंतर चाकूने भोसकले

Next Post

लोकशाहीचा हश्शा! नोटाची हत्या

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
अग्रलेख

कटाक्ष – हा कुठला त्याग ?

by गणेश सावंत
May 11, 2026
अग्रलेख

कटाक्ष – हा कुठला त्याग ?

by गणेश सावंत
May 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -सत्ताकक्षातले पांढरपेशी दरोडेखोर

by गणेश सावंत
May 8, 2026
Next Post

लोकशाहीचा हश्शा! नोटाची हत्या

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?