बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामधून दररोज मोटार सायकलची चोरी होत आहे. त्यातच शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक स्थळांमधून जास्त प्रमाणात मोटार सायकलची चोरी होवू लागली. जिल्हा रूग्णालयाच्या परिसरामधून सातत्याने गाड्या चोरीला जातात. गेल्या चार दिवसामध्ये तीन मोटार सायकल चोरीला गेल्याने वाहन धारकात एकच खळबळ उडाली आहे.
अमोल अंबादास घोडके हे जिल्हा रूग्णालयामध्ये समुपदेशक म्हणुन कार्यरत आहेत त्यांनी आपली मोटार सायकल क्र.एम.एच.23.ए.व्ही.6312 ही रूग्णालय परिसराच्या पार्किंगमध्ये उभा केली होती. सदरील ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या पुर्वी काळजे विशाल यांची एम.एच.23 ए.व्ही.0741 आणि अन्य एक अशा तीन गाड्या चार दिवसाच्या कार्यकाळामध्ये चोरीला गेल्या आहेत. जिल्हा रूग्णालयाच्या आवारातून सातत्याने मोटार सायकल चोरीला जात आहेत. मोटार सायकल चोरणारी टोळीला पोलीस प्रशासनाने जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा रूग्णालयाच्या परिसरामधून कित्येक गाड्या चोरीला गेल्या त्याचा तपास लागलेला नाही.









