• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

; अपघाती मृत्यूचा बनाव उघडकीस, ३ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा
बीड, प्रतिनिधी : अंजनवती येथील दशरथ परदेशी (वय ४५) आणि धीरज येडे (वय २६) यांनी एका व्यक्तीचा खून करून तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, नेकनूर पोलिसांनी कोणताही ठोस सुगावा नसताना अवघ्या तीन दिवसांत या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत दोन्ही आरोपींना तळोजा परिसरातून ताब्यात घेतले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नेकनूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मयताचा मृतदेह त्याच्या वाहनासह रस्त्यालगत आढळून आल्याने प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी तपास अधिक सखोल पद्धतीने सुरू ठेवला. तपासादरम्यान हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे निष्पन्न झाले.
मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस स्टेशनच्या पथकाने रात्रंदिवस मेहनत घेतली. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), लोकेशन विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

तपासात आरोपींनी पुरावे नष्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी विविध धागेदोरे जोडत आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी फरार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विशेष पथके रवाना करण्यात आली. अखेर तळोजा परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, बीड, तळोजा पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश येवले व त्यांचे पथक, टेक्निकल सेलचे तिकी सुरवसे तसेच इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदरची कारवाई नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा तपास अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये सफौ. संजय गुंड, दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, बालाजी ढाकणे व सुधाकर जायभाये यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अपघाताचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या ७२ तासांत जेरबंद करून गुन्ह्याचा उलगडा करण्यात आल्याने ही कारवाई नेकनूर पोलिसांच्या तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Previous Post

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Please login to join discussion

ताज्या बातम्या

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक
  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?