• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकीय संस्काराचे वाभाडे; विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आमदारात धक्काबुक्की, बंडखोर सेना आमदार महेश शिंदेंनी अमोल मिटकरींवर हात उगारला

by Beed Reporter
August 24, 2022
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राच्या राजकीय संस्काराचे वाभाडे; विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आमदारात धक्काबुक्की,  बंडखोर सेना आमदार महेश शिंदेंनी अमोल मिटकरींवर हात उगारला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

महाराष्ट्राच्या राजकारणाचे वस्त्रहरण
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्र विधानभवनाच्या पायर्‍यांवर आजपर्यंतच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधार्‍यांविरोधात घोषणाबाजी करायचे. सरकारविरोधातील रोष आणि आपल्या मागण्या घोषणाबाजीच्या रुपाने मांडून सत्ताधार्‍यांना जेरीस आणायचे. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या पायर्‍यांवर अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं. आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विरोधकांना घेरण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांनी ठाकरे-पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. सत्ताधार्‍यांच्या घोषणाबाजीने विरोधी पक्षाचे आमदार चिडले. त्यांनीही थेट सत्ताधार्‍यांना भिडत त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. आमदार अमोल मिटकरी, रोहित पवार, चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधार्‍यांना भिडण्यात अग्रभागी होते. यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश शिंदे आणि मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. व्हिडीओत मिटकरी महेश शिंदे एकमेकांना गुद्दे घालत असल्याचं दिसून येत आहे. इतरही आमदारही एकमेकांना भिडल्याने विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गोंधळ माजला होता.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधार्‍यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसर्‍या बाजूला लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती. यावेळी रोहित पवारही प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.

अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री
एकनाथ शिंदेंकडे तक्रार विधान भवनाच्या पायर्‍यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायर्‍यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले…
या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायर्‍यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ
भरत गोगावले यांचा इशारा
हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायर्‍यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.

Previous Post

ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजारो कामगार एकवटले; माजलगावमध्ये डॉ.डी.एल.कराड, मोहन जाधव यांनी घेतली राज्यस्तरीय परिषद

Next Post

रोख ठोक- माज,मस्ती,संस्कारावर गच्छंती अधिवेशनात भाद्रपदाचा महिना

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
रोख ठोक- माज,मस्ती,संस्कारावर गच्छंती अधिवेशनात भाद्रपदाचा महिना

रोख ठोक- माज,मस्ती,संस्कारावर गच्छंती अधिवेशनात भाद्रपदाचा महिना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?