बीड (रिपोर्टर) सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगळे चौक सिरसाळा येथे अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून 7464 रूपयांचा गुटखा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.
सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगळे चौक येथे सरजाद पठाण आणि रमेश कुंडलिक लहाने (दोघे रा.सिरसाळा) हे गुटखा विक्री करत असल्याची माहिती सिरसाळा पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी छापा मारला असता राजनिवास सुगंधी पानमसाला, आरएमडी पानमसाला आणि उचे लोगो की उंची पसंद असा 7464 रूपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटख्यासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी सिरसाळा पोलिसात पो.ह.सारूक यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.