• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख- सौराष्ट्र ते महाराष्ट्र, बिल्किसवर बलात्कार, धर्मांधांची लाळ

by Beed Reporter
August 28, 2022
Reading Time: 1 min read
0
अग्रलेख- सौराष्ट्र ते महाराष्ट्र, बिल्किसवर बलात्कार, धर्मांधांची लाळ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
इ.स. 2002 साली सौराष्ट्रात झालेले ते जात्यांध कत्लेआम आजही आठवले की स्वत:ला माणूस म्हणून घेण्याची लाज वाटते. हिंदू असो वा मुसलमान या दोघांचीही ढाल करत धर्मांधांनी आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजल्या. मुसलमानांना आणि हिंदूंना एकमेकांसमोर दुश्मन म्हणून उभे करत एकमेकांचे खून के प्यासे बनवले. जे लोक गर्व से कहो हम हिंदू है असे छातीठोकपणे म्हणत होते ते स्वत:च्या अथवा स्वत:च्या लेकराच्या हातात शस्त्र घेऊन मुसलमानाच्या अंगावर कधीच गेले नव्हते, इस्लाम खतरे मे है चा नारा देणारे दंगलीत कधीच उतरले नव्हते. उतरले होते ते सर्वसामान्य. केवळ हिंदू आणि मुसलमानांमधल्या अशा काही धर्मांधांनी त्यांचे माथे भगवे आणि हिरवे करून टाकले होते. त्या जात्यांध पणाचा तो विस्फोट जळणार्‍या रेल्वेत दिसून आला आणि जळणार्‍या गोध्रात पहावयास मिळाला. इथे माणुसकी इतकी शुन्य झाली होती की, समोर आलेल्या आया-बहिणींनाही हे धर्मांध सोडत नव्हते. मग ते हिंदूचे असोत वा मुसलमानांचे धर्मांध ते धर्मांधच असतात. बिल्किस बानोसारखी विवाहिता आपल्या आई-मुलांसह घरात असते, हिंदूंचे एक नव्हे दोन नव्हे अख्खा जत्था तिच्या घरात शिरतो, तिच्या डोळ्यांदेखत तिची आईची हत्या करतात, तीन वर्षाच्या तिच्या मुलीला जिवानीशी मारतात, गरोदर असलेली बिल्किस बानो जिवाच्या अकांतात ओरडत असते, स्वत:च्या जिवाची भीक मागत असते, धर्मांध इथे बिल्किसच्या त्या माणुसकी असलेल्या ओरडण्याकडे याचक म्हणून उभी असलेल्या बिल्किसकडे मायेने सोडा, करुणेनेही पहात नाहीत. तिथे तिच्यावर बलात्कार करतात, गरोदर असलेल्या बिल्किसवर झालेला हा बलात्कार माणुसकीला आणि माणुस म्हणवून घेणार्‍यांना चुल्लुभर पाणी मे डुब मरण्या इतपत लज्जास्पद बिल्किस या अत्याचाराविरुद्ध जेव्हा आवाज उठवते तेव्हा गांधीबापूचं सौराष्ट्र बरबटल्यागत बिल्किसला मदत करण्याऐवजी बिल्किसवर अत्याचार करणार्‍यांना मदत करते. हा कुठला राष्ट्रधर्म? हे कुठले राष्ट्रप्रेम? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा स्वामी विवेकानंदांचा देश आहे आणि या देशात अकरा लोक महिलेवर बलात्कार करत असताना ती महिला न्यायासाठी टाहो फोडत असताना गांधी बापूंच्या सौराष्ट्रातले तेव्हाचे आणि आजचे मतीशुन्य सरकार या टाहोकडे दुर्लक्ष करत असेल तर

शिवबांच्या महाराष्ट्रातच न्याय
होऊ शकतो हे पुन्हा एकदा मुसलमान असलेल्या बिल्किस बानोने उभ्या जगाला ठणकावून सांगितले. सौराष्ट्रामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही, तिथले तत्कालीन भाजप सरकार बलात्कार्‍यांच्या पाठिशी उभे आहेत. बलात्कार्‍यांचे तळवे चाटत आहे. आपल्या शिलावर तेव्हाही अत्याचार झाला आणि आता तना-मनावर, स्वाभिमानावर गुजरातेतलं सरकार अत्याचार करतय म्हणून बिल्किस बानोचा खटला हा गुजरातबाहेर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये न्याय मिळेल ही अभिलाषा बिल्किसला होते, म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पुन्हा एक पिडित महिला याचक म्हणून आली. शिवबांच्या काळात लुटीमध्ये मिळून आलेले सरदाराची सून आई-बहिण म्हणून साडी-चोळी करत परत पाठवणार्‍या शिवबांच्या महाराष्ट्रात सौराष्ट्राची लेक आली होती. उभ्या जगाला महाराष्ट्राचा अभिमान वाटावा, सत्यमेव जयतेचा जय जयकार करावा, असा निकाल आला आणि बिल्किसवर बलात्कार करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात न्याय होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्यानंतर बिल्किस स्वाभिमानाने अधिक ताठरपणे पुन्हा उभी राहत गेली. मात्र आजच्या धर्मांधांनी केवळ बिल्किस मुसलमान आहे म्हणून बलात्कार्‍यांना मुभा देण्याइरादे

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात
छत्रपती शिवाजी महाराजांना लज्जा वाटेल असे, भारतीय तिरंग्याची लज्जा जाईल, असे कृत्य पुन्हा एकदा सौराष्ट्राने केले. दुर्दैव याचे वाटते सातत्याने तोंडात राम असणार्‍या गांधी बापू पासून ते आजच्या नमोंना गुजरात सरकारच्या त्या निर्णयावर संताप का आला नाही? रामाचे नाव मुखी असणे आणि बगलात सुरी केवळ एखाद्या धर्मासाठी ठेवणे हे रामराज्य नव्हते, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नाही.‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा ज्याचा धर्म असेल हेच ज्याचे कर्म असेल तोच रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य देशात आणि राज्या राज्यात आणू शकतो. बिल्किसवर झालेला बलात्कार तळपायाची आग मस्तकाला नेणारी होती. एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणात, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात त्या अकरा बलात्कार्‍यांना गुजरात सरकार सोडून देते, त्यांची शिक्षा माफ करते हे कशोचे धोतक आहे? लाल किल्ल्यावरून स्त्री शक्तीचा जयजयकार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने अकरा बलात्कार्‍यांना माफी दिली हे पाप कुणाचे? हा सवाल विचारावा लागेल. बलात्कार करणारा हा मस्तवाल मुसमुसलेला रेडा असतो, त्याला कुठली जात-धर्म अथवा पंथ नसतो. तो कामातुराने मदमस्त होत आपली कामाग्नि शमवण्यासाठी हिंडत असतो. अशाच अकरा कामातूर मदमस्त रेड्यांनी बिल्किसचे वाटोळे केले. त्या अकरा बलात्कार्‍यांना ठेचण्यापेक्षा, त्यांच्या विचारांना ठेचण्यापेक्षा त्यांना सोडून देण्यात येते आणि त्यापेक्षाही अत्यंत संतापजनक ते  ब्राम्हण आहेत म्हणून
ते संस्कारी आहेत, त्यांचे वर्तन चांगले आहे, त्यामुळे त्यांना सोडून देण्यात येते, त्या ब्राम्हण बलात्कार्‍यांवर फुले उधळली जातात. हे संतापजनक नव्हे काय? भाजपाचा एखादा आमदार वरील वक्तव्य करत असेल, जातीवाचक शब्द घेऊन बलात्कार्‍याबरोबर त्या जातीचीही बदनामी करत असेल, तर संताप येणार नाही का? गुजरात सरकारच्या आजच्या कार्यप्रणालीवर आणि भाजपाच्या मदमस्त असे बेताल वक्तव्य करणार्‍या नेतृत्वावर खरे तर पायतान काढायला हवेत. परंतु धर्माच्या नशेमध्ये अफुच्या गुंगीत अखंड भारतीयांना हिंदुत्वाच्या नावाखाली निद्रिस्त करून सोडलेल्या आजच्या सरकारने सर्वसामान्यांना सत्य काय, असत्य काय हे पाहण्याची दृष्टीच येईना. इथं हिंदू-मुसलमान, शिख-इसाई, दलित-सवर्ण, उच्चवर्णीय, क्षत्रिय, शुद्र या अशा बकवास शब्दाखाली माणसे एकत्रीत यायला लागतील तेव्हा ब्राम्हणच सोडा धर्माधर्मात अविचारी, कुविचारी, बलात्कारी जन्माला येतील. याचं पाप जातीच्या आणि धर्माच्या जोरावर राजकारण करणार्‍या आजच्या तथाकथीत राजकारण्यांच्या मार्थी मारावं लागेल. आमचा जन्म हिंदूत झाला, हा आमचा दोष की उद्धार, बिल्किसचा जन्म मुसलमानात झाला तो तिचा दोष की तिचा उद्धार? अगोदर आईच्या उदरातून माणसाचा जन्म होतो आणि त्यानंतर त्याच्यावर कुठल्या धर्माचा आहे याचा ठप्पा पाडला जातो. जिथं स्वाभिमानाने अखंड जगात हिंदूस्तान असा एक देश आहे ज्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विजयी विश्‍व तिरंगा प्यारा म्हणत जय हिंदचे नारे देतात. त्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ता कार्यकाळात जर भाजपाचेच नेते बलात्कार्‍यांना जातीच्या आधारे संस्काराचे सर्टिफिकेट देऊन माफी देत असतील तर अशा नेत्यांचे, अशा राज्यकर्त्यांचा निषेध करणे कमीच परंतु अखंड जातीतल्या, धर्मातल्या लोकांनी आता बलात्कार्‍यांना पाठिशी घालणारे या हिंदूस्तानाला मानापानाने वागवू शकतील, की नागवू शकतील हे ज्याने त्यानेच ठरवावे.

Previous Post

जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महापूर, 12 लाखांचा गुटखा जप्त, पेठ बीड पोलिसांनी माफिया सोडला की पळाला ? , माजलगाव, बीडमध्ये कारवाई; तडजोडीसाठी गुटखा माफियांची पळापळ

Next Post

सामान्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवण्याचे काम अमरसिंहनी केले-आ. अशोकराव पवार, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यागांना झाले कृत्रिम अवयवांचे वाटप

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
सामान्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवण्याचे काम अमरसिंहनी केले-आ. अशोकराव पवार, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यागांना झाले कृत्रिम अवयवांचे वाटप

सामान्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवण्याचे काम अमरसिंहनी केले-आ. अशोकराव पवार, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यागांना झाले कृत्रिम अवयवांचे वाटप

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?