वडवणी (रिपोर्टर):- राज्याच्या विधानसभा सभागृहात मी नविन असल्याने काय बोलायचं,बोलल्यानंतर काय करायचं या सर्व गोष्टीचे निवारण करण्यासाठी मी आ.प्रकाश सोंळके यांचे मार्गदर्शन घेत आसतो.तेच माझे सभागृहातील मार्गदर्शक आहेत.असे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार व खा.शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी वडवणी येथील एका कार्यक्रमात भाव उद्गार काढले आहे.
वडवणी शहरातील बीड-परळी हायवे रोड याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भगवान लंगे व पत्रकार राम लंगे यांच्या माऊली फर्निचर माँलचे उद्घाटन जामखेड मतदार संघाचे आ.रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.प्रकाश सोंळके,मुंबई बाजार समितीचे सभापती आशोक डक, जि.प.सभापती जयसिंह सोंळके, ह.भ.प.भगवान महाराज राजपुत,यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.या उद्घाटन प्रसंगी आ.रोहित पवार म्हणाले कि,माझ्या भागात प्रामुख्याने पाण्याची मागणी लोक करत असून या प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत असून आ.सोंळके यांनी धरणाच्या मध्यमांतून या भागातील दहा हजार हेक्टर जमिन ओलीताखाली आणली असून शेतात जे पिकत ते विकल जात असून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जमा होतात याचं मोठ समाधान मला देखील आहे.आजच्या तरुणाईमध्ये सळसळत रक्त आहे आणि हे रक्त आता व्यवसायाच्या मध्यमांतून उद्योगांकडे यावं यासाठी याभागाचे आ.प्रकाश सोंळके आणि जयसिंह सोंळकेसह मी सुध्दा कटिबध्द आहे.असे म्हणत मी राज्याच्या सभागृहात नवखा असल्याने काय बोलायच,बोलल्यानंतर काय करायचं या सर्व बाबीचे मार्गदर्शन घेण्यासाठी मी आ.प्रकाश सोंळके यांच्या जाऊन घेतो.त्यामुळे सभागृहातील ते मार्गदर्शक आहेत.असे भाव उद्गार आ.रोहित पवार यांनी काढले आहेत.
रक्तरंजीत झाल्यानंतर तालुक्याची निर्मिती – आ.प्रकाश सोंळके
या भागाचे नंदनवन करणारा उर्व्ध कुंडलिका प्रकल्प उभा करण्यासाठी तात्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी फार मोठा निधी दिला आणि आज यामध्यमांतुन दहा हजार हेक्टर जमिन ओलीताखाली आली आहे.तर वडवणी तालुक्याची निर्मिती हि सन 1997 सालाच्या दशकात झाली आहे.अनेकांनी अंगावर गोळ्या झेलून रक्तरंजीत झाल्यानंतर या तालुक्याची निर्मिती झाली आहे.असं मत यावेळी अध्यक्षणीय भाषणात आ.प्रकाश सोंळके यांनी मनोगत व्यक्त केले आहे.