बीड (रिपोर्टर) डॉक्टरांची चिठ्ठी नसताना अनाधिकृतपणे औषधाची विक्री करणार्या दोन मेडिकलवर औषध प्रशासनाने धाड टाकली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जी औषधे मेडिकलवाल्यांनी विकली त्या औषधाचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले.
बीड शहरातील कारंजा टॉवर येथील न्यू विहान या मेडिकलवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. या मेडिकलवाल्याने गेल्या काही महिन्यात विविध ऐषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री केल्याचे समोर आले. जी औषधी विकण्यात आली त्याचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आलेले आहे. या प्रकररी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक विलास विश्वनाथ दुसाणे यांच्या फिर्यादीवरून शेख सईद शेख मझहर व सारंग अनिल धोंगडे या दोघांविरोधात कलम 328, 276, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.