पाटोदा (रिपोर्टर) बिलकीस बानो यांच्या वर अत्याचार करणार्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणार्या 11 जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या, हजरत मोहम्मद (स.) यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणान्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कायदा लागू करावा, भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणार्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावा. या प्रमुख मागण्यांसाठी पाटोद्यामध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार दि.15 सप्टेंबर 2022रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन तहसिल कार्यालयावर हजारोंच्या संख्येने महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हक के लिए लढना तो बगावत नहीं होती अशी हाक देत महिलांनी एल्गार केला असून या निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
पाटोदा येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला व या बाबतचे निवेदन पाटोदा तहसिलदार यांना देण्यात आले असून,दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजीच्या मोर्चाची पाटोदा तालुक्यात तयारी युद्ध पातळीवर सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व महिला एकत्र झाल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक-बस स्टँड-हजरत राज मोहम्मद चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पाटोदा तहसिल कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे नियोजन देखील महिलांच्या नेतृत्वातच करण्यात आले होते. तहसिलमध्ये अनेक महीला भगीनींनी आपले मनोगत व्यक्त करुन निषेध व्यक्त केला.









