साठी ओलांडलेल्या निष्ठावंतांच्या घेतल्या भेटी
बीड (रिपोर्टर) ज्या काळात शिवसेना म्हणजे काय हेे तळागाळातील लोकांना माहित नव्हतं तेव्हा बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सामान्य माणसांपर्यत घेवून जाण्याचं काम तुम्ही केलत. सत्ता नसतांना, शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात तुम्ही कुठल्याही लालसेशिवाय प्रचंड संघर्ष करुन शिवसेना वाढवलीत, तिचा विस्तार केलात त्या कामामुळेच आज शिवसेनेला हे वैभव प्राप्त झालेले आहे. आम्हाला सगळं आयतं मिळालं असून आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत, कारण संघर्षाच्या काळात तुम्ही बाळासाहेबांचा विचार जपलात. त्यांची शिवसेना जपली व वाढवलीत. असे प्रतिपादन युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे गुरुवारी (दि.15) बीड जिल्ह्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमूख बाळासाहेब पिंगळे यांच्या वतीने पिंगळे गल्ली येथील पंचाचे सभार्गह येथे जेष्ठ शिवसैनिकांशी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. बीड शहरातील शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील साठी ओलांडलेल्या पण शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या या निष्ठावंताचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करतांना माजी जिल्हाप्रमूख बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, आज वयानं जेष्ठ असलेले हे निष्ठावंत शिवसैनिक खर्या अर्थानं जिल्ह्यातील शिवसैनेचं वैभव आहेत. आम्ही यांच्यातील आक्रमकपणा, बेधडकपणा व बाळासाहेबांच्या विचारांवरची निष्ठा बघून शिवसेनेकडे आकर्षीत झालोत. कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पदच सर्वेाच्च आहे ही शिकवण यांच्याकडे बघून आम्हाला मिळाली. बाळासाहेबांचा विचार व शिवसेना यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या या निष्ठावंतांनी खर्या अर्थानं सेना वाढवली, रुजवली. पुढे यांच्या आम्ही याच विचारांचा धागा पकडून ती विस्तारण्याचं काम केलं. काळाच्या ओघात सेनेत नवे लोकं येत गेले, पदाधिकारी बदलत गेले. मात्र या शिवसैनिकांनी आपली निष्ठा कधीच बदलली नाही. कायम शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून काम करणे ही शिकवणच आम्हाला या बदलत्या व तकलादू राजकारणाच्या काळात निष्ठेचं महत्व सांगणारी आहे. ही जेष्ठ शिवसैनिक आमची प्रेरणा असल्याचेही बाळासाहेब पिंगळे म्हणाले. तर वरुण सरदेसाई म्हणाले की, सामान्य शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यामुळे शिवसेनेचे मोठेपण नाही, तर तळागाळातील हा सच्चा शिवसैनिकच शिवसेनेचा आत्मा आहे. बाळासाहेबांचा विचार, त्यांच्या हिंदुत्वाची शिकवण जपणारे हे असे जेष्ठ शिवसैनिकच शिवसेनेचा आधार आहेत. ज्या काळात कुठली सत्ता नव्हती त्या काळात झपाटल्यागत तुम्ही बाळासाहेबांचा विचार तळागाळात घेवून गेलात म्हणून ही शिवसेना उभा राहिली. आमच्या पिढीला सगळं आयतं मिळालं आहे. जे मिळालं आहे ते तुमच्या संघर्षामुळं त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. या प्रलोभनाच्या वादळात, बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं षडयंत्र रचणार्यांच्या काव्याला हानून पाडण्यासाठी आज तुमच्यासारख्या निष्ठावंत व जेष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन आमच्यासारख्या नव्या पिढीतील सैनिकांना तुम्ही द्यावे असे आवाहन करतांना वरुण सरदेसाई यांनी जेष्ठ शिवसैनिकांचे आभार मानले. यावेळी संपर्क प्रमुख धोंडु दादा पाटील जिला प्रमुख अनिल जगताप अप्पासाहेब जाधव मा. आ. सुनील धांडे विस्तारक विपुल पिंगळे परीक्षित पाटिल हनुमान पिंगळे सुशील पिंगळे सागर बहिर दिलीप गोरे परमेश्वर सातपुते रावसाहेब गुर्जर नितिन धांडे मुकुंद भालेकर बाबा पांढरे बबन पवार लक्ष्मण सिंह ठाकुर बबलू दिवे गणेश जगताप गणेश राउत नंदू येवले कचरु गलधर मनोज परदेसी शिलचंद्र पोरवाल महादेव परस्कर गोरख शिंदे लखन जगताप चंद्रसेन मनेरी गणेश तपासे संतोष बायस प्रभु सिंह ठाकुर दत्ता वळे बबन सुष्कर इत्यादि उपस्थित होते.









