नेकनूर (रिपोर्टर) मतिमंद असलेल्या एका 20 वर्षीय मुलीवर 54 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ जेरबंद केले. ही घटना पोत्रा येथे घडली.
पोत्रा येथील एका 20 वर्षीय मतिमंद तरुणीवर गावातीलच भीमराव प्रभातराव पोकळे (वय 54) याने 19 सप्टेंबर रोजी पहाटे अत्याचार केला. सदरील हा अत्याचार एका शेतामध्ये केला असून या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार भीमराव पोकळे या नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास पोलीसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय कल्याणी कोळी या करत आहेत.