बीड (रिपोर्टर) हॉटेल गौरवचे मालक तथा उद्योजक नितीन खोड यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात सामाजीक कार्यातून साजरा करर्यात आला. वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण, गरजूंना फळवाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजक हॉटेल सचीनचे मालक तथा युवा उद्योजक सचीन लांडे यांनी केले होते.
युवा उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले हॉटेल गौरवचे मालक नितीन खोड यांचा काल वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बीडसह ग्रामीण भागातील त्यांच्या मित्र कंपनीने हारतुरे, होर्डींग्ज अथवा अन्य दिखाव्यावर खर्च न करता सामाजीक बांधिलकी जपत खोड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पाऊस असल्याने वृक्षारोपण अधिक महत्वाचे असल्याचे सांगत सचीन लांडे यांनी 300 पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार या वेळी केला. रुग्णालयासह अन्य भागात गरजुंना फळवाटप करून ग्रामीण भागातील काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यानिमित्ताने करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन हे युवा उदद्योजक सचीन लांडे, युवा उद्योजक रोहन गायकवाड, जीवनराव कदम यांच्यासह आदी तरुणांनी केले होते.










