गेवराई (रिपोर्टर):- सामान्य कुटुंबात जन्माला येऊन शिवनाथ मस्के सारख्या धडपड्या युवकांनी अल्पावधीत बँकींग क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक केले असून गरजूंना कर्ज वाटप करून त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या संस्थेचे लवकरच वटवृक्षात रुपांतर होईल असा विश्वास माजी आ.अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.
गेवराई येथील जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था यांची नुतन शाखा उद्घाटन तालुक्यातील सिरसदेवी या ठिकाणी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आले यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार अमरसिंह पंडित, चिंतेश्वर ह.भ.प दिलीप महाराज घोगे, ह.भ्.प भगवंत महाराज पुरी, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन काळे पाटील, नगरसेवक श्याम काका येवले, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, पत्रकार भागवत जाधव, मा. उपनगराध्यक्ष मधुकर वादे, तुकाराम मस्के, दादासाहेब घोडके, अरूण मस्के, भगवानबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष मयूर वैद्य, सावता अर्बन उमापुर बँकेचे अध्यक्ष दिगंबर टेकाळे, हरीश पटेल, रविंद्र गिरी, हरीष पटेल, हरीष पांढरे, जय भवानी बँकेची संचालक गौसभाई, युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ऍड. श्रीनिवास बेदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी आ. अमरसिंह पंडित म्हणाले की, जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन अवघे ५ वर्ष झाले आहे. या संस्थेने कमी दिवसात आपले नाव लौकिक केले असून या पतसंस्थेने ५ वर्षात ११ कोटी ठेवी करून ८ कोटी कर्ज वाटप केले आहे. ५ वर्ष नफ्यात ऍडीट वर्ग अ मध्ये काम केले आहे. कोरोना या विषाणुजन्य परिस्थितीत ही जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेने मदतीचा हात पुढे करून या अनाथ मुलांना किराणा साहित्य दिले त्याच प्रमाणे पाच गरजवंत विढवा महिला शोधून त्या महिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी दोन हजार रूपये या पतसंस्थेकडून देण्यात येते ही सर्व कार्य समाज हिताचे व कौतुकास्पद असून या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजूंना कर्ज वाटप करून त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्याचे काम व्हावे असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.बाबु वादे यांनी केले. त्यांनी प्रास्वाविकपर भाषणात संस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राम कु-हाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवनाथ मस्के, राम कु-हाडे, प्रा.बाबु वादे, श्रीमती संगिता कु-हाडे, श्रीमती संगिता वादे, रवि काळे आदीसह सर्व बँकेच्या कर्मचार्यांनी सहकार्य केले.