परळीतही विविध दुर्गोत्सव मंडळांच्या आरतींना धनंजय मुंडेंची उपस्थिती
परळी (रिपोर्टर) परळी तालुक्याला लागूनच असलेल्या सोनपेठ तालुक्यात येणार्या डिघोळ येथील रेणुका देवी मंदिरात आज माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी दर्शन घेऊन देवीची आरती केली. यावेळी रेणूका देवी हे आपले कुलदैवत असून, या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे मानस धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
परभणीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर यांनी आयोजित केलेल्या पंगतीच्या निमित्ताने धनंजय मुंडे हे रेणुका देवी मंदिरात दर्शनासाठी आले होते. देवीच्या आरती नंतर श्री. मुंडे यांनी सहकार्यांसमवेत पंगतीत बसूनच प्रसाद ग्रहण केला. यावेळी राजेश दादा विटेकर यांच्यासह अजयशेठ मुंडे, लक्ष्मण तात्या पौळ, चंद्रकांत राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीकांत विटेकर, अभय मुंडे यांसह आदी उपस्थित होते. तदनंतर धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील विविध पाच दुर्गोत्सव मंडळांना भेटी देऊन देवीची आरती केली. यावेळी त्यांनी परळी शहरातील शंकरपार्वती नगर येथील हिंगलाज माता मंदिर, शिवाजीनगर येथील शिवाजीनगर थर्मल रोड दुर्गोत्सव मंडळ, शिवाजीनगर सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, टी पी एस येथील श्री तुळजाभवानी दुर्गोत्सव मंडळ, टी पी एस कॉलनी येथील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ या मंडळांच्या आरतींना उपस्थिती लावली. ठिकठिकाणी पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी श्री मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.