बीड (रिपोर्टर) सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्या कुटुंबियावर पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये खोटी अॅट्रॉसिटी दाखल झाली असून या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
राजकीय नेते व धनदांडगे यांच्या दबावापोटी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर अॅट्रासिटी दाखल करण्यात आली. सदरील ही अॅट्रॉसिटी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी दाखल करून घेतली. कुठलीही शहानिशा न करता खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी युनुस चर्हाटकर, माजी सैनिक अशोक येडे, नितीन सोनवणे, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, सय्यद सादेक, शेख मुबीन, शेख मुश्ताक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.










