श्रद्धा खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
बीड (रिपोर्टर) श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध खयटला जलदगती न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.