मुंबई (रिपोर्टर) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट त्यांचे जवळचे मित्र राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत दिली. त्यांनी अशी माहिती दिली की, विक्रम गोखलेंची परिस्थिती चिंताजनक आहे, पण अफवांवर विश्वास ठेवू नका. दामलेंच्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेत्याचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचे शरीर म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही आहे.
विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेत्याला 5 नोव्हेंबर रोजी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा त्यांचे मित्र राजेश दामले यांनी समोर येत पत्रकारांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.