बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये विविध कारणासाठी आत्महत्या करणार्यांची संख्या वाढू लागली. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहे तर दुसरीकडे शाळकरी मुलेही आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. जिरेवाडी येथील सोळा वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला तर रायमोहा आणि नागापूर येथेही आत्महत्येच्या घटना घडल्या.
आकांक्षा सर्जेराव कापसे (वय 16, रा. जिरेवाडी ह.मु. बहीरवाडी) या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुसरी आत्महत्येची घटना रायमोहा येथे घडली. शिवाजी जाधव (वय 55 वर्षे) य इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली. विनायक भानुदास चव्हाण यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या तिन्ही आत्हमत्यांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.