बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करुन फरार झालेल्या एका 20 वर्षीय आरोपीचा स्थानीक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या असून त्याला गजाआड केले.जबरी चोरी उघड करण्यास स्थानीक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही कारवाई काल करण्यात आली.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 एप्रिल 2022 रोजी जबरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा र.नं.129/2022 गुन्हा दाखल होता. मात्र त्या चोरीचा उलगडा झाला नव्हता. दि. 30 मे रोजी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रोहीत उर्फ लाला सुरेंद्र सौदा वय-20 वर्षे, रा.बलभीम नगर पेठ बीड याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्यावर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहे. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी रोहीत याला शिवाजी नगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पो.हे.कॉ.मनोज वाघ, रामदास तांदळे, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, प्रसाद कदम, सतिष कातखडे,विक्की सुरवसे, अशोक कदम यांनी केली.