महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले.
पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिनेदेखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासीनी तीला पाहीले आणि विहिरीतुन बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तीन हकीकत सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
महिलेचा जीव वाचला असला, तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.महाड एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.