बीड (रिपोर्टर) साय. दैनिक बीड रिपोर्टरचे सहसंपादक गणेश जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात मंगळवारी (दि. 3 जानेवारी) मोठ्या थाटात पार पडला.
पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघ यांच्या
संयुक्त विद्यामाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिंचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रिपोर्टरचे सहसंपादक गणेश जाधव यांना 2023 चा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
मंगळवार दि. 3 जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, गटविकास अधिकारी सचिन सानप, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन पत्रकार गणेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी किशोर पिंगळे, शारदा डुगलच, दिनेश पवार, डॉ. लक्ष्मण जाधव, सिमा ओस्तवाल यांच्यासह पुरस्कार सोहळ्याचे संयोजक पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भागवत वैद्य, उपजिल्हाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे, विजय पोकळे आदिंची उपस्थिती होती.