बीड (रिपोर्टर) नुकसान भरपाई घोषीत होऊन अनेक दिवस लोटले मात्र अद्यापही शासनाने शेतकर्यांच्या खात्यावर पैसे टाकले नाही. शेतकर्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
घोषीत केलेले अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत वाटप करण्यात यावे, सततच्या पावसाने नुकसान झालेल्या वंचित शेतकर्यांना मदत घोषीत करण्यात यावी, 2022 खरीप पिक विमा निर्दोष पारदर्शी करावा, कारण नुकसान होऊनही, तक्रार देऊनही बर्याच शेतकर्यांना अजून विमा मिळाला नाही, ज्यांना मिळाला तो नुकसानीच्या प्रमाणात नाही. एकाच महसूल मंडळात व गटातही एकाच पिकासाठी मिळालेल्या विमा वितरणात तफावत आहे. त्यासाठी विमा वितरणाच्या नुकसानीच्या याद्या विमा पोर्टलवर ऑनलाईन प्रकाशीत करून विमा वितरणात पारदर्शकता आणावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी काशीराम सिरसाट, मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, अॅड. अजय बुरांडे, गंगाधर पोटभरे, विष्णू देशमुख, जगदीश फरताडे, भगवान बडे, कृष्णा सोळंके, दादासाहेब सिरसाट, संजय चोले, सावळाराम उबाळे, अशोक डाके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.