बीड (रिपोर्टर) निजामकालीन जि.प. शाळांची डागडुजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील 352 वर्गखोल्यांसाठी 36.95 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी किती दिवसांमध्ये खर्च होईल आणि वर्गखोल्या कधी दुरुस्त होतील? हाही प्रश्नच आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने वर्ग खोल्यांसाठी पैसे दिलेले आहेत. आतापर्यंत 100 टक्के निधीचा खर्च झालेला नाही.
बीड जिल्ह्यासह राज्यभरात अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट आहे. दुरुस्तीअभावी काही शाळा पडायला झाल्या. राज्य सरकार नवीन खोल्या बांधकामासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळेच जि.प. शाळांची अवस्था वाईट झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने निजामकालीन शाळांचा सर्व्हे केला होता. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील 172 शाळांमधील 352 वर्ग खोल्यांसाठी 36.95 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यातला जवळपास 60 ते 70 टक्के निधी खर्च झाला. उर्वरित निधी किती दिवसांमध्ये खर्च होईल हाही प्रश्नच आहे. जितका निधी खर्च झाला त्या निधीमध्ये शाळांची चांगल्या पद्धतीने डागडुजी करण्यात आली का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.