बीड (रिपोर्टर)ः-सायंकाळच्या सुमारास गावात दरोडेखोर आले आहेत. त्यांच्याकडे चाकू, सुरी सह हत्यार असल्याने गावात एकच खळबळ उडाली. तरुणांनी धाडस करत दोघांना पकडून ठेवले. अन् पोलिसांना फोन करुन आम्ही दरोडेखोर पकडले असल्याचे सांगितले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अधिक चौकशी केली असता ते दरोडेखोर नसून डुक्कर पकडणारे बाप-लेक असल्याचे समोर येताच सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. ही घटना माजलगावत तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली.
सायंकाळी शेतातील काम करुन घरी परतणार्या शेतकर्यांना गाव कुसाला दोघे जण दडून बसल्याचे निदर्शनास आले.
त्यांच्याकडे डुक्कर पकडण्यासाठी काठी अन् दोर दिसल्याने गावकर्यांचा संशय बळावला अन् गावातील तरुण एकत्र येत दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांना माहिती दिली. दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या प्रमुख प्रभा पुंडगे यांनी त्यांना मारहाण करुन नका असे ग्रामस्थांना सांगितले. त्या बाभुळगावात पोहचताच त्यांनी चौकशी केली असता. ते चोरटे नसून डुक्कर पकडण्यासाठी गावात आले असल्याचे समोर आले.