बीड (रिपोर्टर) ग्राऊंडवर मुलासोबत खेळण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाजवळील मोबाईल चोरट्याने हिसकावून घेतला होता. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तात्काळ चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.
ज्ञानदीप बालासाहेब तोंडे (वय 15 वर्षे) हा दहावी वर्गात शिक्षण घेणारा मुलगा आपल्या मित्रांसोबत ग्राऊंडवर खेळण्यासाठी गेला होता. या वेळी चोरट्याने चापट मारण्याची भीती दाखवून त्याच्या जवळील अॅप्पल कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारंजा रोड येथील शेख फेरोज शेख सादेक या चोरट्यास जेरबंद करून त्याच्या जवळून मोबाईल हस्तगत केला. ही कारवार्स पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक सय्यद अशफाक, मनोज परजने, सुशेन पवार, अविनाश सानप, बाळासाहेब सिरसाट यांनी केली.