महाराष्ट्रातून पुरस्कार मिळवणारी एकमेव ग्रामपंचायत
बीड(रिपोर्टर): नांदुर हवेली ग्रुप ग्रामपंचायतचे कार्य पाहता या ग्रामपंचायतला केंद्र सरकारने स्वच्छ सुजल शक्ती सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. 4 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी यांच्या हस्ते सरपंच शेख मन्नाबी मुजफ्फर पटेल यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतला पुरस्कार मिळाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतचे अभिनंदन केले.
बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती विकासाभिमुख कामे करतात. तालुक्यातील नांदुर हवेली-हिंगणी हवेली-खामगाव-पारगाव जप्ती ग्रुप ग्रामपंचायतने पाणी पुरवठ्याची कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेले आहे. याची दखल घेवून केंद्राच्या स्वच्छता विभागाने नांदूर हवेली ग्रा.पं.ला स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 हा पुरस्कार जाहीर केला आहे. दि.4 मार्च रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मूजी यांच्या हस्ते दिल्ली येथे सरपंच शेख मन्नाबी मुजफ्फर पटेल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळवणारी ग्रा.पं. महाराष्ट्रातील एकमेव आहे. या पुरस्काराबद्दल बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतचे अभिनंदन केले आहे. दरम्यान सरपंच शेख मन्नाबी या पटेल फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल यांच्या मातोश्री आहेत.