नेकनुर(रिपोर्टर):- डॉक्टरला देवासमान मानले जाते. नेकनुर येथील 22 वर्षीय महिला एका डॉक्टराकडे उपचारासाठी गेली असता डॉक्टरने सदरील महिलेची छेडछाड करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी डॉक्टराविरोधात नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 वर्षीय महिला 6 मार्च रोजी नेकनुर येथील डॉ. अमित कल्याणकर यांच्याकडे उपचारासाठी गेली होती, सदरील डॉक्टरने सकाळी उपचार केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा बोलावुन घेतले त्यानुसार महिला उपचारासाठी डॉक्टरकडे गेली असता डॉक्टरने महिलेशी अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी डॉ. अमित कल्याणकर याच्याविरोधात नेकनुर पोलीस ठाण्यात कलम 354, 354 ए, 354 बी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदरील या डॉक्टरच्या गैरकृत्याबाबत नेकनूरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा या नराधम डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.