बीड :
धुलिवंदनाच्या दिवशी ड्राय डे असतांना बीड शहरातील एका बिअर बार चालकाने बिअर शॉप सुरु ठेवले. ग्राहक अन् बार चालकांमध्ये वाद किरकोळ वाद झाल्याने ग्राहकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी काल बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र नानासाहेब भावले (रा. धनगरवाडी, ता. जि.बीड) यांनी बीड शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आह ेकी, ते धुलिवंदनाच्या दिवशी बीड शहरातील जालना रोडवरील सुखसागर बिअर बार सुरु होती. त्यावेळी रात्री भावले हे बिअर घेण्यासाठी तेथे गेले. त्यांनी बिअरची किंमत जास्त सांगितल्यावरुन भावले यांनी येवढे पैसे कसे काय? असा प्रश्न विचारताच आज ड्राय डे आहे. असे म्हणून बप्पासाहेब घुंबर्डे, महेश बप्पासाहेब घुंबर्डे (दोन्ही रा. गणपती नगर बीड) व इतर एक अनओळखी यांनी संगणमत करुन भावले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर काल बीड शहर पोलिसात भावले यांनी तक्रार दिली.