बीड (रिपोर्टर) बीड बाजार समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज छाननी सुरू असून चार उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. यामध्ये मस्के सुभद्राबाई आश्रुबा, लांडे लिंबाजी दगडू, मोरे सुशिला आसाराम आणि सपकाळ दशरथ यांचे अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे नामंजूर करण्यात आले तर चार अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत या त्रुटी दूर करण्यासाठी संधी दिलेली आहे. 166 पैकी 158 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत.










