बीड (रिपोर्टर) शहरातील रायगड कॉलनी येथील एका घरातील विजेचे मिटर कसलीही पुर्वसूचना न देता काढून घेऊन नेण्यात आले. मिटर बसविण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली मात्र विजवितरण कंपनीने अद्यापपर्यंत मिटर बसवले नाही. याबाबत विद्यार्थीनीने थेट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र पाठवून मिटर बसविण्याबाबतची विनंती केली आहे.
कल्याण भास्कर हे क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी पुर्वीचे विजेचे थकित बील भरले आणि नवीन मिटर घेण्यासाठी अर्ज दाखल केला. नवीन मिटर वीज वितरण कंपनीने दिले मात्र कसलीही पूर्वसूचना न देता विजवितरण कंपनीने सदरील मिटर काढून नेले. मिटर बसविण्याबाबत कंपनीकडे अनेक वेळा विनंती करण्यात आली मात्र कंपनीने याकडे साफ दुर्लक्ष केले. घरात वीज नसल्यामुळे अंधारात राहावे लागत आहे. याबाबत कांचन कल्याण माने या विद्यार्थीनेने थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली. विजेचे मिटर पुन्हा बसवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात आली आहे.