Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडहिवरगव्हणजवळ अपघात ;एक ठार; एक गंभीर

हिवरगव्हणजवळ अपघात ;एक ठार; एक गंभीर


वडवणी (रिपोर्टर):- पाहुण्यांची भेट घेऊ परत येत आसताना एस.टी.बस व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात वडवणी तालुक्यातील हिवरगव्हण येथील ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे.हि घटना शिटी ता.परतुर जि.जालना येथे काल रात्री सात वाजण्यच्या सुमारास घडली आहे.

वडवणी तालुक्यतील मौजे हिवरगव्हण येथील रहिवाशी आसणारे अंकुश ज्ञानोबा जगताप वय-४५ व आप्पासाहेब अच्युत नाईकवाडे वय-३५ हे दोघे ता.परतुर येथील पाहुण्यांना भेटण्यासाठी गेले आसता परत येत आसताना दुचाकी पॉंशन प्रो एमएच ४४,०३४४ व एस.टी.बस क्रं.एमएच २० बीएल-३४७८ यांची समोरासमोर धडक झाली आसून या अपघातात दुचाकी वरील आप्पासाहेब अच्युत नाईकवाडे हे जागीच ठार झाले आहेत.तर सोबती आसणारे अंकुश ज्ञानोबा जगताप हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना औंरगाबाद येथील शासकिय घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.तर हा अपघात प्रंचड विचित्र स्वरुपात झाला असून दुचाकी नावाला पण उरली नसल्याच प्रथमदर्शी व्यक्तीकडून सांगण्यात आले असून आप्पासाहेब नाईकवाडे यांच्यावर हिवरगव्हण गांवी शोकांकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात आई, वडिल,पत्नी,एक मुलगा,मुलगी आहे.

Most Popular

error: Content is protected !!