Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनामंगळवारी आढळले १४७ पॉझिटिव्ह

मंगळवारी आढळले १४७ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहे. काल आलेल्या अहवालामध्ये १२४ बाधित आढळून आले होते. तर आज २९१७ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून यामध्ये १४७ जण बाधित आढळून आले आहेत.


कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे बीडमध्ये खरेदी-विक्रीसाठी ढिल देण्यात आली मात्र या दरम्यान व्यापार्‍यांसह नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने पुन्हा एकदा कोरोनाची लाट येते की काय, अशी चिंता जिल्हाधिकार्‍यांसह नामांकित डॉक्टर करू लागले आहेत. त्यातच आज आलेल्या अहवालात कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला आहे. यामध्ये अंबाजोगाई १२, आष्टी २९, बीड ३१, धारूर ६, गेवराई १३, केज ११, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १४, शिरूर १५,तर वडवणी तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी आजही घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!