बीड (रिपोर्टर) दुचाकी चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून घरासमोर लावलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्या लंपास होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. धारूर, अंबाजोगाई शहर आणि तलवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक दुचाकी लंपास झाल्याच्या तक्रारी काल दुपारी दाखल झाल्या.
दत्ता प्रल्हाद लाड या शेतकर्याने आपली दुचाकी तलवाडा येथील आठवडी बाजारात लावली होती. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी एम.एच. 23 ए झेड 2760 ही दुचाकी काल पाच वाजता चोरून नेली. माणिकराव शिवाजी मुंडे (रा. पहाडी पारगाव ता. धारूर) यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. 44 एक्स 8826) ही दुचाकी आपल्या घरासमोर लावली असता ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. गणेश विक्रम तांदळे (रा. चर्हाटा ता. बीड) यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. 12 क्यू. एच. 6603) ही अंबाजोगाई शहरातील मेडिकल परिसरात लावली असता ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.