बीड (रिपोर्टर) शहरातील सावतामाळी चौक परिसरात राहत असलेल्या एका 38 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सदरील महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
शारदा चंद्रकांत काळे (वय 38 वर्षे, रा. श्रीकृष्ण मंदिरसमोर, सावतामाळी चौक परिसर) या महिलेने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिऋती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली होती. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.