बीड (रिपोर्टर) परळी येथील ऐतिहासिक नासर जंग दर्गाहच्या जमीनीची मालकी ताब्यात देऊन सातबारा कोरा करण्यात यावा या मागरीसाठी जिल्हधिकारी कार्यालयासमोर माजी नगरसेवक सलीम बापुंसह आदींचे आंदोलन सुरू आहे.
परळी येथील ऐतिहासिक देवस्थानाच्या जमीनी सिटी सर्व्हेच्या नावाखाली बोगस पिटीआरच्या आधारे बरेच फेरफार झालेले आहेत. सदरील झालेले बेकायदेशीर फेरफार तात्काळ रद्द करून मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे, परळी न.प.चे मुख्याधिकारी, दुय्यम निबंधक, तहसीलदार यांच्यासह आदी कर्मचार्यां विरोधात कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या वेळी माजी नगरसेवक सलीम बापू, शेख महेबूब, शेख महेमूद, शेख इलियास, सय्यद समीर, महेमूद यासीन बेग यांच्यासह आदींचा सहाभगी आहे.