हज यात्रेकरूंकडून मुंबई विमानतळापेक्षा औरंगाबाद विमानतळावरून तब्बल 88 हजार रुपये जास्त आकारण्यात येत आहेत. त्यामुळे यात्रेकरूंनी सीईओ हज कमिटी ऑफ इंडियाकडे प्रस्थान स्थळ बदलण्याचा अर्ज केला आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट घेऊन संबंधित प्रकरण त्यांच्यासमोर मांडले तेव्हा खा. पवार यांनी अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र देऊन संपर्क साधला. सदरचा विषय सोडवण्याबाबत विनंती केल्याचे महेबूब शेख यांनी म्हटले.









