पात्रुड (रिपोर्टर)ः-विज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे पात्रुड परिसरात विजेचा सतत पुरवठा खंडीत होत आहे. वेळावेळी मागणी करुनही कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने आज येथील ग्रामस्थ एकनाथ मस्के यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती आहे.
पात्रुडच्या विज पुरवठ्याबाबत अनेक वेळा संबधीत अधिकार्यांना निवेदन दिले. याची दखल अधिकार्यांनी घेतली नाही. आज कार्यालयासमोर नागरीकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन माजी सरपंच एकनाथ मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यावेळी नजीर कुरेशी, लतीफ मोमीन, घनशाम भुतडा, शेख जब्बार, वहीद पटेल, मोमीन जुबेर, हाजी मोमीन, भगवान सुरवसे, हाफेज फकीम, बाळासाहेब धुमाळ, जाकेर खादीम यांच्यासह आदिंची उपस्थित होती.