Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रतळीये दुर्घटनाग्रस्त गावाची राणेंनी केली पाहणी

तळीये दुर्घटनाग्रस्त गावाची राणेंनी केली पाहणी


रायगड (रिपोर्टर):- रायगडः गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे हे आज कोकण दौर्‍यावर असून त्यांनी महाडयेथील तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल. राज्य व केंद्र सरकार या ठिकाणी पुन्हा चांगल्याप्रकारे वसाहत बांधतील, असा शब्द राणेंनी दिला आहे. ’या घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना आहे, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!