“अनेक नेते राजकारणात हरले त्यांना संधी देण्यात आले. पण, मला संधी देण्यात आली नाही.”
“आम्ही स्मरण करुन गोपीनाथ मुंडेंच वाक्य आठवलं तर एकच वाक्य ऐकू येतं ते म्हणजे, मी थांबणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. या नंतर हे वाक्य हजारो वर्ष उच्चारल तरीही या वाक्याच महत्व कमी होणार नाही. कुणाला धमकावण्यासाठी, इशारा करण्याची गरज नसते. ज्याला इशारा करायचा असतो तिथपर्यंत ते जात असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘कुणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन बंदुक चालवणार एवढे खांदे मला मिळाले नाही, मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करतात.पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोक भूमिका घेईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.