जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरवादी पक्ष संघटनेची निदर्शने
बीड (रिपोर्टर) नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज सर्व आंबेडकरवादी पक्ष-संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
या वेळी रवी वाघमारे, आशिषकुमार चव्हाण, अजय सरवदे, अनिल तुरुकमारे, संदीप जाधव, प्रशांत ससाने, प्रमोद शिंदे, संगीताताई वाघमारे, अरुणाताई आठवले, अनिताताई डोंगरे, दिपक कांबळे, धम्मपाल विद्यागर, बाळासाहेब काकडे, राजू कांबळे, नितीन सोनवणे, रजनीकांत वाघमारे, विनोद सवाई, गौतम इनकर, अशोक प्रधान, नितीन जोगदंड, अशोक काकडे, सिद्धार्थ जोगदंड, अशोक हुंबरे, शांतीदूत घोडके, धिरज वाघमारे, विशाल सोनवणे, आकाश वाघमारे, लखन जोगदंड, मिलिंद सरपदे, विजय चांदणे, अशोक जोगदंड, संतोष जोगदंड, नितीन मुजमुले, अमोल चंदनशिव, प्रवीण टाकणखार, अमोल धनवे, भारत काकडे, अक्षय कोकाटे, हर्षद वाघमारे, चेतन पवार, सुधीर कथले, युवराज औसरमल, श्रीकांत वाघमारेंसह आदींची उपस्थिती होती.