अवचार कुटुंबियास शासनाने मदत करावी
बीड (रिपोर्टर):- इंदिरानगर भागात राहणार्या भारत अवचार यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीशीच्या भीतीपोटी त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला प्रशासन जबाबदार असून प्रशासनाने संबंधिताचा बळी घेतला असल्याचा आरोप बाबूराव पोटभरे यांनी केला असून पोटभरे यांनी आज अवचार कुटुंबियाच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबियास शासनाने मदत करावी, अशी मागणी केली.
गायरान जमीनप्रकरणी शासन नोटीसा बजावत आहेत. इंदिरानगर येथील भारत अवचार यांनाही काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीचा धसका घेत भारत अवचार यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप बाबूराव पोटभरे यांनी केला आहे. पोटभरे यांनी आज अवचार कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबियांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. अवचार कुटुंबियांना प्रशासनाने मदत करण्याची मागणी पोटभरे यांनी केली आहे.