नेकनूर (रिपोर्टर) : नेकनूर येथे काल प्रशासनाने बालविवाह रोखला. या बालविवाहची माहिती तुम्हीच दिली या संशयावरून सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन घडसिंगे यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयामध्ये लग्न करू नये, असा नियम असताना कायदा सर्रास पायदडी तुडवला जात आहे. गेल्या पंधरा दिवसात प्रशासनाने अनेक बालविवाह रोखले. काल नेकनूर येथेही बालविवाह रोखण्यात आला. या बालविवाहाची माहिती प्रशासनाला तुच दिली, असे म्हणत हर्षवर्धन घडसिंगे यांना मिना दुनघव, जितेंद्र दुनघव, स्वप्नील दुनघव, पवन दुनघव यांनी मारहाण केली. या प्रकरणी रमाबाई हर्षवर्धन घडसिंगे यांच्या फिर्यादविरोधात आरोपींविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.