केज (रिपोर्टर): केज येथील हायवेवरील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना प्रशासनाने उठवल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यापार्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी व्यापार्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा केज विकास संघर्ष समितीच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. मोर्चामध्ये शेकडो व्यापार्यांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी हायवेवरील व्यापार्यांना हटवण्यात आले. जवळपास चारशे व्यापारी उद्ध्वस्त झाले. या व्यापार्यांना पर्यायी जागा नसल्याने त्यांच्यावर (पान 5 वर)
उपसमारीची वेळ आली. शासनाने व्यापार्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी आज केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.









