गावाबाहेर हाकलून देण्याची धमकी
बीड (रिपोर्टर): किरकोळ कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत पती- पत्नीस पाच जणांनी मारहान केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलालाही बेदम मारहाण केली. आमच्या नादी लागू नका जिवे मारुन टाकू, गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली. ही घटना काल दौलवडगाव ता. आष्टी येथे घडली. या प्रकरण आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गोपिनाथ गंगाराम गाडे (रा. दौलवडगाव ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जागेच्या कारणावरुन मिनिनाथ मोहन फसले, अशोक हरीभाऊ फसले, ज्ञानेश्वर धोंडिभाऊ फसले, चांगदेव थोडिभाऊ फसले, नितीन बाळू फासले यांनी बेकायदेशीर जमाव जमवून जातीवाचक शिविगाळ केली. व गाडे यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहान केली. त्यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आष्टी पोलिस करत आहेत.