पुणे : पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणार्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यावेळी गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे देखील गडकरी यावेळी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, अनेक अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले आहे. पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल करण्यात आला आहे. पुण्यात 40 हजार कोटींची कामे भविष्यात पूर्ण करणार आहे.