Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगांव बंद, केज-तालखेडमध्ये रस्ता रोेको जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

माजलगांव बंद, केज-तालखेडमध्ये रस्ता रोेको जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


बीड (रिपोर्टर)ः- तिन कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या नऊ महिन्यापासून दिल्ली येथे शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलन कर्त्यांना समर्थन देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनेने सहभाग घेतला होता. माजलगांव शहरातील व्यापार्‍यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. तालखेडसह केज येथील शेतकर्‍यांनी रस्ता रोको आंदोलन केले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान मोर्चाच्यावतीने धरणे आंदोलन झाले यात अनेकांचा सहभाग होता.

केंद्र सरकाने तिन कृषी कायदे आणलेले आहे. याला शेतकरी संघटनेचा विरोध असून गेल्या नऊ महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. आज विविध पक्ष संघटनेच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. यात बीड जिल्ह्यातील विविध पक्षसंघटनेने सहभाग घेतला होता. माजलगांव शहरातील व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. भाई गंगाभिषण थावरे यांनी व्यापार्‍यांना व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.तालखेड येथे शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. केज शहरामध्ये बसस्थानकासमोर रस्ता रोको झाला. यावेळी मोहन गुंड, रमेश गालफाडे, संतोष मैड, बबनराव गायकवाड, व्यकंटराव ढगे, हनुंमत भोसले यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!