Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमपारधी वस्ती हल्ला प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू कालपासून लहान मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार...

पारधी वस्ती हल्ला प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू कालपासून लहान मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही

पोलीस प्रशासनाच्या विरोधात समाजात संताप
बीड (रिपोर्टर)ः- चोरीच्या संशयातून पारधी वस्तीवर काही गावगुंडानी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विस ते पंचवीस लोकं जखमी झाले. यातील दोन वर्षाचा एक मुलगा काल मरण पावल्यानंतर आज सकाळी 60 वर्षीय वयाच्या वृध्दाचा मृत्यु झाला. या घटनेने संताप व्यक्त होत असून या प्रकरणी पाटोदा पोलीस बोलण्यास तयार नाही. पोलीस प्रशासन टोलवाटोलवी करत आहे. पारधी समाजाच्या काही लोकांनी आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोषी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


पाटोदा तालुक्यात पारनेर येथील पारधी वस्तीवर परवा मध्यरात्री काही गावगुंडानी हल्ला केला. या हल्ल्लयामध्ये 20 ते 25 जण जखमी झाले. लहान मुलांसह महिलांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत काल दोन वर्षाचा मुलगा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. आज सकाळी अभिमान पादरु काळे वय-60 वर्षे हे ही मरण पावल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पाटोदा पोलीस मात्र बोलण्यास तयार नाही. गावामध्ये तणावाचे वातावरण असून या प्रकरणातील दोषी विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पारधी समाजाचे लोक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेले आहे. काल मरण पावलेल्या दोन वर्षाच्या मुलावर अजुनही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाही. या दोन्ही मयतावर अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.


जातीयवादी गुंडांना तात्काळ गजाआड करा- बाबुराव पोटभरे
पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील पारधी वस्तीवर हल्ला करुन, लहान बालकाची हत्या करणा-या जातीवाद्यांना गजाआड करून, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवुन, आरोपींना फासावर लटकावा अशी मागणी बहुजन विकास मोर्चीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.


पारनेरच्या पारधी वस्तीवर येथील जातीयवादी गुंडांनी केलेला हल्ला हा पुर्व नियोजित असून, पारध्यांची घरे जाळून संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली आहे. जातीयवादी गुंडाच्याच्या हल्ल्यात सिद्धांत अरुण काळे या बालकाचा खून करण्यात आला असून, जातीयवाद्यांना आणखी काही पारध्यांचे मुदडे पाडावयाची होती. या हल्ल्यात आठ ते दहा जण गंभीर झाले असून पारधी वस्तीवरील लोक भयभीत असल्याने, या वस्तीला पोलिस संरक्षण देण्यात यावे, सर्व जातीयवाद्यांना अटक करण्यात यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, येथील पारध्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशा मागण्या बाबुराव पोटभरे यांनी केल्या. आज भेट देणार बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे आज सोमवारी दुपारी पारनेर पारधी वस्तीला भेट देणार आहेत. त्यानंतर पोलिस अधिकार्यांची भेट घेणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!