बीड(रिपोर्टर): बीड येथील माजी नगरसेवक तथा पहिले वृत्तपत्र वितरक क्रांती बुक स्टॉलचे मालक रमेश बेदरकर यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या शहागड मधील अगरनांदुर येथील त्यांच्या शेतात संध्याकाळी 6 वा. त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेदरकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यामध्ये त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बेदरकर यांचे क्रांती बुक स्टॉल आहे. ते बीडचे पहिले वृत्तपत्र वितरक होते. अनेक वर्षे त्यांनी नगरसेवक पद भुषविले. पहिल्यांदा त्यांनी पेपर वाटपाचे कामसुद्धा केलेले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बेदरकर कुटुंबियांच्या दु:खात दै.रिपोर्टर परिवार सहभागी आहे.